36 वर्षीय अभिनेत्री हिना खान सध्या आपल्या आजारपणामुळे चर्चेत आली आहे. एवढंच नव्हे तर या आजाराशी दोन हात करण्यासाठी हिना खानने चाहत्यांकडे मदत मागितली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खान चाहत्यांच्या घराघरात पोहोचली. हिना खान सोशल मीडियावर देखील तेवढीच ऍक्टिव असतं. असं सगळं असताना हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आपल्या आजाराची माहिती दिली आहे.
एवढंच नव्हे तर रमजान सारख्या पवित्र महिन्यात आपल्याला या आजारपणामुळे रोझा ठेवता येणार नाही याची खंत देखील तिने व्यक्त केली आहे. अभिनेत्री हिना खानला नेमकं काय झालंय? या आजाराची लक्षणे आणि घरगुती उपाय देखील आपण यामध्ये पाहणार आहोत.
हिना खानला ज्या आजाराने ग्रासले आहे त्याचे नाव गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स GERD आहे. याबद्दल चाहत्यांना सांगताना तिने इंस्टाग्रामवर लिहिले - 'मला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सचा त्रास आहे. जर मी रमजानमध्ये उपवास ठेवला तर तो आणखी वाढेल. अजवा खजूर खाल्ल्याने आराम मिळेल असे आई सांगते.
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्समध्ये, पोटातील आम्ल पोटातून अन्ननलिकेमध्ये जाते. त्यामुळे छातीत जळजळीशिवाय इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हिना खानला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराची भूमिका साकारून ओळख मिळाली. या शोने हिना खानचे आयुष्य बदलले. यानंतर ती 'बिग बॉस सीझन 11' मध्ये होती. यानंतर ती अनेक रिॲलिटी शो आणि ओटीटीमध्येही दिसली. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज काहीतरी पोस्ट करून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.
जीईआरडी हा आजार खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे होतो. मुख्य म्हणजे जे लोक बाहेरचे अन्न जास्त खातात, तळलेले पदार्थ, तेलकट मसाले वगैरे जास्त खातात त्यांना अशा समस्या जास्त होतात. याशिवाय चहा, कॉफी, अल्कोहोल आदींमुळे जीईआरडीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे छातीत जळजळ होण्याचीही तक्रार असते. त्याच वेळी, GERD ची शक्यता इतर काही कारणांमुळे देखील जास्त आहे. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, काय कारण असू शकतात.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)